बाजार समित्यांकडून शासकीय योजनांना बगल: सुभाष देशमुख, तासगावात विकासकामांचे उद्घाटन; ८० टक्केबाजार समित्यांमधील अधिकाºयांचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:44 IST2018-01-02T00:44:13+5:302018-01-02T00:44:17+5:30
तासगाव : केवळ वेगळ्या विचाराची सत्ता असल्याने राज्यातील ३६० पैकी केवळ ८० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जाते.

बाजार समित्यांकडून शासकीय योजनांना बगल: सुभाष देशमुख, तासगावात विकासकामांचे उद्घाटन; ८० टक्केबाजार समित्यांमधील अधिकाºयांचा प्रताप
तासगाव : केवळ वेगळ्या विचाराची सत्ता असल्याने राज्यातील ३६० पैकी केवळ ८० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना राबवली जाते. बेदाणा पंढरी तासगावमध्ये एक रुपयाचे बेदाणा तारण कर्ज दिले जात नाही, हे दुर्दैव आहे. ८० टक्केबाजार समित्या शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात उदासीन असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.
तासगाव शहरातील विविध विकास कामांचा प्रारंभ आणि उद्घाटन देशमुख यांच्याहस्ते पार पडले. त्यावेळी पालकमंत्री, सांगली जिल्हा तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. प्रताप नाना पाटील, डॉ. विजय सावंत, नगराध्यक्ष, तासगाव नगरपरिषद, सौ. दीपाली पाटील, उपनगराध्यक्ष, तासगाव नगरपरिषद, अनिल कुत्ते पक्षप्रतोद, मुख्याधिकारी अभिजित वायकोस उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, संजयकाका पाटील यांच्या रूपाने तासगावसह सांगली जिल्ह्याला एक विकासपुरुष लाभला आहे. खासदार असले तरी, शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड असते. असा एक आगळा वेगळा हा खासदार आहे.कर्जमाफी योजनेबाबत बोलताना देशमुख म्हणाले, मागील कर्जमाफीत अनेक घोटाळे झाले; मात्र यावेळी अपात्र शेतकºयांना कर्जमाफी मिळणार नाही आणि ज्या शेतकºयांना काही कारणांमुळे अर्ज भरता आला नाही, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
सुभाष देशमुख म्हणाले, मराठा मोर्चाच्या निमित्ताने बेरोजगारीचा विषय ऐरणीवर आला होता, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घ्यावे. त्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत विनातारण कर्ज मिळेल व गरजूंचे त्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून शासन भरेल, असे देशमुख म्हणाले.
संजयकाका पाटील म्हणाले की, तासगाव नगरपालिका निवडणुकीवेळी आम्ही तासगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन तासगावकरांना दिले होते. त्यानुसार आज साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी मार्केटचे उद्घाटन करीत आहोत. त्याचबरोबरीने पालिकेची प्रशासकीय इमारत तसेच सिनेमा हॉल असणाºया इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी तासगावसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कार्यक्रमात दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर टेंभूसाठी विशेष निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणारे खासदार पाटील यांचा शेतकºयांनी सन्मान केला.
तासगाव नगरपालिका शिक्षण मंडळ व किशोर गायकवाड यांच्या कामाचे पालकमंत्री खासदार पाटील, जिल्हाधिकारी काळम- पाटील यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.
यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते वरचे गल्ली, तासगाव येथे वॉटर एटीएम, एसटी पिक-अप शेड आणि रस्त्यावरील नवीन पुलाचे उद्घाटन तसेच तासगाव नगरपरिषद, तासगावच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पायाभरणी व कोनशिला अनावरण समारंभ तसेच स्टँड चौक, तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
'पुतळ्यांचे लवकर अनावरण : संजयकाका
खासदार पाटील म्हणाले, तासगाव शहरात असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जुना झाला होता. तो बदलून अश्वारूढ पुतळा येत्या दहा ते बारा दिवसात तयार होईल. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे एकत्रित अनावरण केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
तासगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाचे लोकार्पण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते.