मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; पतीसह चाैघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:36+5:302021-05-27T04:29:36+5:30

मिरज : मिरजेतील सुभाषनगर येथे मुलगी झाल्याच्या कारणावरून व माहेरून सोन्याचे दागिने, चारचाकी घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासू, सासरा ...

Marital harassment due to having a daughter; Crime against Chaigha along with her husband | मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; पतीसह चाैघांविरुद्ध गुन्हा

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ; पतीसह चाैघांविरुद्ध गुन्हा

मिरज : मिरजेतील सुभाषनगर येथे मुलगी झाल्याच्या कारणावरून व माहेरून सोन्याचे दागिने, चारचाकी घेण्यासाठी पैसे आणण्यासाठी पती, सासू, सासरा व नणंदेने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत मयुरी सुमित कांबळे (वय २७) या विवाहितेच्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मालगाव रस्त्यावर बरगाले फ्लॉट येथील सुमित अरुण कांबळे याच्याशी मयुरीचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. एक मुलगीही झाली आहे. लग्नानंतर पती सुमित, सासू सुप्रिया अरुण कांबळे, सासरे अरुण भीमराव कांबळे आणि नणंद स्नेहाली सुभाष साबळे (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) हे चौघे जण वारंवार जाच करीत होते. वंशाला दिवा पाहिजे असताना मुलगी झाली. या कारणाने व माहेरातून सोन्याचे दागिने, चारचाकी घेण्यासाठी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल मयुरी कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी पती सुमित कांबळे, सासू सुप्रिया कांबळे, सासरा अरुण कांबळे आणि नणंद स्नेहाली साबळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Marital harassment due to having a daughter; Crime against Chaigha along with her husband