माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:56+5:302021-04-06T04:24:56+5:30
सांगली : घरभाडे देण्यासाठी गंठणची मागणी करत माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्यांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
सांगली : घरभाडे देण्यासाठी गंठणची मागणी करत माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्यांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा प्रतीक गायकवाड (वय ३१, रा. जुना वाशी नाका,कोल्हापूर, सध्या माधवनगर) हिने पती प्रतीक नागनाथ गायकवाड, सासू भारती नागनाथ गायकवाड व सासरा नागनाथ बलभीम गायकवाड ( सर्व रा. जुना वाशी नाका,कोल्हापूर) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शिल्पा हिचे माधवनगर माहेर असून कोल्हापूर सासर आहे. २२ फेब्रुवारी २०१९ ते ८ ऑगस्ट २०२० या कालावधीत फिर्यादी शिल्पा हिला सासरच्या लोकांनी त्रास दिला. तिचे एटीएम कार्ड ब्लॉक करून दुसरे एटीएम कार्डही मागितल्याने राग होता. घराचे भाडे देण्यासाठी तिचे गंठणचीही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तिला उपाशी पोटी ठेवून घरात सामान आणून न देता मानसिक व शारीरिक छळ करून त्रास दिल्याचे व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.