मराठीला उज्वल भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:12+5:302021-02-05T07:24:12+5:30
राज्य संस्कृती मंडळ, मुंबई व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव ...

मराठीला उज्वल भवितव्य
राज्य संस्कृती मंडळ, मुंबई व दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कळंबी (ता. मिरज) येथील अजितराव घोरपडे विद्यालयात कार्यशाळा व कविसंमेलन भीमराव धुळूबुळू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रा. धुळूबुळू म्हणाले, मराठी भाषा देवनागरी लिपीतील अतिशय समृद्ध भाषा आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात मराठी भाषेला उज्वल भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कविसंमेलनात वर्षा चौगुले, नामदेव भोसले, मनीषा पाटील, महेश कोष्टी, ॠजुता माने, नाना हलवाई, डाॅ. अनिता खेबूडकर, बाळासाहेब कांबळे, सतीश हुळ्ळे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. शाळेचे मुख्याध्यापक डी. एन. पाटील यानी प्रास्ताविक केले. आदमअली मुजावर यानी स्वागत केले. स्मिता माळी यानी सूत्रसंचालन केले.
फाेटाे : २७ मिरज १