शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

देवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नसल्याचा मराठा स्वराज्य संघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 18:17 IST

सांगली : देवेंद्र फडणवीस , भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे ...

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नाहीमराठा स्वराज्य संघाचा इशारा

सांगली : देवेंद्र फडणवीस, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे फडणवीसांना राज्यात फिरुन देणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाने दिला आहे. मराठ्यांना आरक्षण ही जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असल्याचा दावा संघाने केला.अध्यक्ष महादेव साळुंखे, प्रवक्ते पंडितराव बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षणातील अडथळे विशद केले. ते म्हणाले, राज्यातील ९७ टक्के मराठा अत्यंत विपन्नावस्थेत दिवस कंठत आहे. त्यांना आरक्षण मिळू नये यासाठी भाजप, स्वयंसेवक संघ व फडणवीसांनी माणसे पेरली.

मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे सर्व याचिकाकर्ते त्यांचेच हस्तक आहेत. त्यामुळे फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत, तो धुवून काढण्याचे काम बहुजनांनी करायला हवे. आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरु असताना त्यांनी गोंधळ निर्माण केला. त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत.ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाविरोधात फडणवीस सरकारने २०१७ मध्ये अध्यादेश काढला, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणातून ओबीसी हद्दपार होण्याची वेळ आली आहे. त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारणापोटी संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले जात आहे हे खपवून घेणार नाही. फडणवीस राज्यात कोठेही गेले तरी त्यांच्या गाड्या अडवू. फिरुन देणार नाही.यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायचकवाड, अविनाज शिंदे, मनपा क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण, कवठेमहांकाळचे अमोल जाधव, शरद पवार, गोपाळ पाटील, सतीश पाटील, पंडित पाटील, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.भाजपमधील मराठ्यांनी विचार करायला हवासाळुंखे म्हणाले, भाजपमधील मराठा नेत्यांनी समाजाशी निष्ठा दाखवून दिली पाहिजे. भाजपमध्ये राहून आपल्याच समाजबांधवांच्या आरक्षणाला विरोध करणे त्यांना शोभणारे नाही. पक्षाची तळी उचलताना आपण समाजाचे नुकसान करत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSangliसांगलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा