शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : सांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम, मांगलेत एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 15:50 IST

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते.

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात आंदोलनाची धग कायममांगलेत एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले 

सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातडीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. यामध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीही होते.

गेल्या चार दिवसापासून आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजतर्फे राज्यभरात आंदोलन सुरु आहे. सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गुरुवारी सकाळी वारणानगर-शिराळा ही एसटी (क्र. एमएच १४-८९३१) मांगर्लेमार्गे निघाली होती.

शिवाजी चौकापर्यंत बस आली. पण पुढे रस्त्यावर लाकडी ओंडके ठेवण्यात आले होते. त्यामुळे चालकाने रस्त्याकडेला एसटी थांबविली. तेवढ्यात एसटीवर जोरदार दगडफेक सुरु झाल्याने चालकासह प्रवाशी बचावासाठी सीटखाली लपून बसले. त्यानंतर पाठीमागून टायरच्याबाजूने अज्ञातांनी एसटी बस पेटविली.

हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांनी पाहिला. त्यांनी बस पेटल्याचे आरडा-ओरड करुन सांगितले. काही ग्रामस्थांनी पुढे येऊन प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. चालकानेही बसमधून उडी मारली. तोपर्यंत बस चारही बाजूंनी पेटली होती. या घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी मदतीने पाण्याचा मारा करुन बसची आग विझविण्यात आली. ही बस शिराळा आगाराची आहे.

शोकसभा रद्दआंदोलनास पाठींबा देण्यासाठी गुरुवारी गाव बंद, तसेच फेरी काढून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी चौकात सकाळी दहा वाजता शोकसभा आयोजित केली होता. यासाठी झेंडेही आणले होते. ग्रामस्थांनी सकाळपासून उस्फूर्तपणे बंद पाळला होता. पण तोपर्यंत बस पेटवून दिल्याची घटना घडल्याने गावात तणाव निर्माण झाला. शोकसभा रद्द करण्यात आली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSangliसांगलीkolhapurकोल्हापूर