केंद्र सरकारच्या चुकीमुळे कोरोनात अनेकांचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:58+5:302021-06-02T04:20:58+5:30
इस्लामपूर : केंद्र शासनाने कोरोनाची परिस्थिती, लसीकरण गांभीर्याने हाताळलेले नाही. त्यामुळे असंख्य लोकांचा नाहक बळी गेला असल्याची टीका राजारामबापू ...

केंद्र सरकारच्या चुकीमुळे कोरोनात अनेकांचे बळी
इस्लामपूर : केंद्र शासनाने कोरोनाची परिस्थिती, लसीकरण गांभीर्याने हाताळलेले नाही. त्यामुळे असंख्य लोकांचा नाहक बळी गेला असल्याची टीका राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी केली.
राजारामबापू कारखान्यामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रतीक पाटील यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. यावेळी कामगार नेते शंकरराव भोसले, तानाजीराव खराडे, सरव्यवस्थापक एस. डी. कोरडे उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर राखणे या बाबी जीवन शैलीचा भाग व्हायला हव्यात. त्यासाठी कामगारांचे प्रबोधन करायला हवे.
याप्रसंगी विजय मोरे, सुनील सावंत, जयंत निबंधे, प्रशांत पाटील, डॉ. प्रकाश म्हाळुंगकर, अमोल पाटील, धैर्यशील पाटील, उमेश शेटे, संभाजी सावंत, सुनील जाधव, डी. एम. पाटील, महेश पाटील, संजय गुरव, आर. एस. पाटील, संदीप कदम यांच्यासह अधिकारी, खाते प्रमुख उपस्थित होते.