शहरं
Join us  
Trending Stories
1
“देवाभाऊ CM आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, योग्यवेळी २१०० रुपये देणार”: शिवेंद्रराजे
2
देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल
3
चीनसोबत मैत्री महागात पडली! भारताने बांगलादेशला दिला धक्का, शेजारील देशांसोबत व्यवसाय करणे कठीण होणार
4
Air India च्या विमानात पुन्हा तेच; एका प्रवाशाने दुसऱ्यावर केली लघवी, DGCA कारवाई करणार
5
आधी 84% टॅरिफ, आता चीनचा अमेरिकेवर आणखी एक हल्ला; 18 कंपन्यांवर कडक कारवाई
6
दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका 'ॲलर्ट'; ६५० रुग्णालयांना डिपॉझिट न घेण्याच्या सूचना
7
सासूला पळवून नेणाऱ्या होणाऱ्या जावयाचा निरोप आला; '२० वर्षे झाली, आता तिला विसरून जा...'
8
“संजय नेहमी आंधळ्या धृतराष्ट्रासोबत असायचा, म्हणजे उद्धव ठाकरे...”; शिंदेसेनेचा खोचक टोला
9
आता इंडिगो जगातील सर्वात महाग एअरलाइन, अमेरिकेच्या डेल्टाला टाकलं मागे; शेअर बनला रॉकेट!
10
ठोशाला ठोसा...! ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचं जशास तसं उत्तर, अमेरिकन प्रोडक्ट्सवरही लादला तगडा टॅरिफ
11
पाणी पडले तरी डिस्प्ले वापरता येतो? तीन गोष्टी वेगळ्या, सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक Poco c71, कसा आहे...?
12
मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर; कोल्हापूर न्यायालयाचा निकाल
13
विराट कोहलीने ज्या जाहिरातींतून कमावले करोडो, त्याच पोस्ट इन्स्टाग्रामवरून केल्या डिलीट? काय घडलं?
14
राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत; केळकरांच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप
15
“मनसे म्हणजे जितनी चावी मारी उतना चले खिलोना, इशाऱ्यावर चालणारी संघटना”; उद्धवसेनेची टीका
16
“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?
17
ट्रम्प यांच्या टेरिफ बॉम्बने चीनमध्ये खळबळ, समुद्रातच माल सोडून पळून जातायत ड्रॅगनचे एक्सपोर्टर्स!
18
१४ महिन्यांची लव्ह स्टोरी, या गावातील तरुणासाठी तरुणी अमेरिका सोडून आली भारतात
19
राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या! भाजपच्या देणग्यांत २११ टक्के वाढ; काँग्रेसची स्थिती काय?
20
चैत्र गुरु प्रदोष: शिव होतील प्रसन्न, गुरुचे मिळेल पाठबळ; कसे करावे व्रत? पाहा, सोपी पद्धत

सांगली: शिवसेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:43 IST

आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले

अविनाश कोळीसांगली : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यापाठोपाठ जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही एकनाथ शिंदे गटाला पाठबळ दिल्याने जिल्ह्यातील शिवसेनेला धक्का बसला आहे. आता पवार यांच्या जागी नवा जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यासाठी पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. या पदावर वर्णी लागावी म्हणून जिल्ह्यातील अनेकांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निकटवर्तीय नेत्यांना सतर्क केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी पक्षाबरोबर एकसंध कसे राहतील याची काळजी घेण्याची व जे पदाधिकारी सोडून गेले त्यांच्या जागी नव्या नियुक्तीची सूचना दिली आहे. याची जबाबदारी संपर्कप्रमुखांवर सोपविली आहे. सांगली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या हाती निवडीचे दोर आहेत. त्यांनीही आतापासून जिल्हाप्रमुखपदासाठी चाचपणी सुरू केली आहे. सक्रिय असलेल्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला या पदावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.यासाठी दुसरे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. पक्षातील एकसंधपणा टिकावा व सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिल्हाप्रमुख असावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. मुंबईत यासाठी दोन बैठकाही पार पडल्या.

आनंदराव पवार यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने जिल्हाप्रमुखपद रिक्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद त्यांच्याकडे होते. इस्लामपूर नगरपालिकेत त्यांनी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते. त्यामुळे त्यांच्या पक्षातून जाण्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. आ. अनिल बाबर यांच्या बंडखोरीतून सावरत असतानाच पवारांच्या बंडखोरीने पक्षाला दुहेरी फटका बसला आहे. अन्य सर्व पदाधिकारी सध्या तरी उद्धव ठाकरेंसोबत आहेत. यासाठी नितीन बानुगडे-पाटील यांनी प्रयत्न केले आहेत.जिल्ह्यातून ही नावे चर्चेतमाजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, चिकुर्डे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, मिरजेतील माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांची नावे चर्चेत आहेत. त्यांच्या समर्थकांनी त्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.

अभिजित पाटील आघाडीवर

आनंदराव पवार यांच्या जागी वाळवा तालुक्यातीलच कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार सुरू आहे. त्यातच मिरज, कवठेमहांकाळ येथील काही जुन्या कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे त्यांचे नाव सध्या जिल्हाप्रमुखपदासाठी आघाडीवर आहे.

टॅग्स :SangliसांगलीShiv Senaशिवसेना