शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 16:42 IST

कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप.

सांगली : जगात कोरोनाच्या नावाखाली भीती निर्माण करुन अनेक लोक मारण्यात आले. कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस आहेत, असे वक्तव्य कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केले.ते म्हणाले की, कोरोनाची लक्षणे किरकोळ स्वरुपाची आहेत. कोरोना ही कोणतीही महामारी नाही. महामारीत लोक पटापट मरतात. परंतु, कोरोनापासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लस घेण्याचे आवाहन केले. ही संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक होत आहे. रेमडेसिवीर इंजक्शनही बोगस आहे. असे अनेक आरोप देखील त्यांनी केले.हिंदुंनी व्होट बँक तयार करावीहिंदुत्ववादाबद्दल ते म्हणाले की, देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागला आहे. संपूर्ण देशावर राज्य करायचे असेल तर सर्व हिंदुंनी एकत्र येऊन व्होट बँक तयार करावी. देशासह जगावर हिंदू राष्ट्र व्हावे, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ आहे. परंतु, हिंदू धर्मात काही विघटक आहेत. त्यांना साफ करणे गरजेचे आहे. हा देश संपूर्ण हिंदूचा होणे गरजेचे आहे आणि देशातील तरुण ते करतील.हिंदू धर्मासाठी काम करणे सोडून ..पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा विकास करीत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा राहील. इतिहासात हिंदुंवर झालेला अन्याय पटवून देणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणे सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानचे संस्थापक नितीन चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.याआधीही कोरोना महामारीवर आणि लसीवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत होते. अनेक महाशयांनी तर हा विषाणूच नसल्याची मुक्तांफळे उधळली होती. यात आता कालीपूत्र कालीचरण महाराज यांची भर पडली आहे.

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन