मानसिंग नाईक व्यक्तिगत परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:08+5:302021-06-26T04:19:08+5:30

जन्म : २६ जून पत्ता : मु. पो. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली. दूरध्वनी : (०२३४५) २७२१४३, २३१००१ ...

Mansingh Naik personal introduction | मानसिंग नाईक व्यक्तिगत परिचय

मानसिंग नाईक व्यक्तिगत परिचय

जन्म : २६ जून

पत्ता : मु. पो. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली.

दूरध्वनी : (०२३४५) २७२१४३, २३१००१

भ्रमणध्वनी : ९८२२१७२२२२

वडिलांचे नाव : लोकनेते स्व. फत्तेसिंगराव आनंदराव नाईक

पत्नी : सौ. सुनीता मानसिंग नाईक

मुले : सौ. शर्मिला राजेंद्र लाड

सौ. मोनालिसा मानसिंग शिंदे

सौ. पल्लवी विक्रमसिंह पाचपुते

श्री. विराज मानसिंग नाईक

सून : सौ. डॉ. शिमोनी विराज नाईक

आवड : व्हॉलिबॉल खेळणे, सांस्कृतिक, सामाजिक व सार्वजनिक विकास, शैक्षणिक, पाणी, शेती व औद्योगिक प्रगतीची आवड.

पदे : विधानसभा सदस्य : शिराळा मतदार संघ २००९ ते २०१४ व २०१९पासून कायम.

चेअरमन : सन २०००पासून विश्वासराव नाईक सह. साखर कारखाना, चिखली.

अध्यक्ष व कार्यकारी संचालक : विराज अल्कोहोल अँड अलाईड इंडस्ट्रिज लि., शिराळा.

संचालक : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली.

चेअरमन : विराज अ‍ॅग्रो बायोशुगर लि., शिराळा.

प्रदेश प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र.

संस्थापक : आपला बझार, शिराळा.

संस्थापक : विराज हायटेक विव्हिंग प्रा. लि., शिराळा.

..................................................

द़ृष्टीक्षेपातील विकास

१) शिराळा, वाळवा तालुक्यांसाठीची महत्त्वाकांक्षी वाकुर्डे बुद्रुक पाणी योजना पूर्णत्वास नेणे.

२) शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणे.

३) विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव पिण्याचे व शेतीच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण करणे.

४) चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे.

५) चांदोली परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास साधणे व रोजगार निर्मिती करणे.

६) गुढे व पाचगणी पठार थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करणे.

७) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास केंद्र उभारणी.

८) शिराळा औद्योगिक वसाहतीच्या विकासाबरोबर रोजगार निर्मिती करणे.

९) शेती प्रगतीसाठी अत्याधुनिक माहिती व मार्गदर्शन करणाऱ्या केंद्राची निर्मिती करणे.

१०) विविध खेळांचे मार्गदर्शन देणारे क्रीडा संकुल उभारणे.

११) मतदार संघातील शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा सक्षम करणे.

१२) चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविणे.

..................................................

कोरोना काळात केलेल्या ठोस उपाययोजना :

१) मतदार संघातील सर्व गावांत दौरा करून जनजागृती करून नियोजन.

२) शासकीय पातळीवर काटेकोर नियोजन.

३) संपूर्ण मतदार संघातील कुटुंबांना (७५ हजार) अर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप.

४) गावोगावी विलगीकरण कक्षाची निर्मिती.

५) शाळकरी मुलांची आगाऊ काळजी म्हणून प्रत्येक शाळेला सॅनिटायझर मशीनचे मोफत वाटप.

६) कोविड रुग्णांसाठी बेडशीट व चादरींचे मोफत वाटप.

७) आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, आदी कर्मचार्‍यांना फेसशिल्डचे वाटप.

८) कोकरूड ग्रामीण रुग्णालय व शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरची उभारणी.

९) शिराळा उपजिल्हा रुग्णालयात सहा टन क्षमतेच्या ऑक्सिजन टँकची उभारणी.

१०) कोकरूड ग्रामीण रुग्णालयासाठी जंम्बो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था.

११) शिराळा उपजिल्हा रुग्णालय व वाटेगाव प्रा. आ. केंद्रात पद भरतीला मंजुरी.

१२) विराज इंडस्ट्रीजमध्ये सॉनिटायझर निर्मिती प्रकल्प सुरू करून मतदार संघातील सर्व

ग्रामपंचायतींना सवलतीच्या दरात सॅनिटायझर पुरवले.

१३) शिराळा उपजिल्हा रुग्णायातील ऑक्सिजन बेडची संख्या ५०वरून १०० केली.

त्यापैकी २५ बेडसाठी लागणारे साहित्य स्वखर्चाने दिले.

१४) बिळाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी पूर्ण.

१५) येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी ४ कोटी रुपये मंजूर.

१६) सागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी ३.५० कोटी रुपये मंजूर.

१७) पाचगणी आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण.

१८) चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू केले.

१९) शिराळा उपजिल्हा रुग्णालयाला स्थानिक विकास निधीतून अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान.

Web Title: Mansingh Naik personal introduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.