इस्लामपूर जायंटस पर्लच्या मानसी साळुंखे अध्यक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:05+5:302021-09-11T04:26:05+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर येथील जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्लच्या अध्यक्षा मानसी अमित साळुंखे आणि यंग जायंटसच्या श्रेया शिंदे यांचा ...

इस्लामपूर जायंटस पर्लच्या मानसी साळुंखे अध्यक्षा
इस्लामपूर : इस्लामपूर येथील जायंटस ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्लच्या अध्यक्षा मानसी अमित साळुंखे आणि यंग जायंटसच्या श्रेया शिंदे यांचा शपथविधी आणि पदग्रहण कार्यक्रम उत्साहात झाला.
जायंटस वेल्फेअर फौंडेशन २ क चे अध्यक्ष डॉ. राजकुमार पोळ, विशेष सदस्य डॉ. अनिल माळी, डॉ. सुवर्णा माळी, ऍड. विकास पाटील, सुमन इटकरकर, सुषमा पोळ, उद्योजक विश्वासराव साळुंखे उपस्थित होते.
सुमन इटकरकर यांनी पहिल्यांदा नूतन सदस्य, कार्यकारिणी आणि नूतन अध्यक्षांना शपथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मानसी साळुंखे आणि श्रेया शिंदे यांना पदावर आसनस्थ करण्यात आले.
डॉ. पोळ म्हणाले, कोरोना काळामध्ये कोरोना प्रतिकार शक्ती वाढवणारी होमिओपॅथिक औषधे पोलीस, कामगार यांना मोफत वाटली. त्याबद्दल ग्रुपचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
मावळत्या अध्यक्ष सरिता पाटील, शीतल साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सुवर्णा माळी यांनी स्वागत केले. प्रभावती पाटील व माधवी आवटे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात आयाेजित विविध ऑनलाईन स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. माधवी आवटे यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा माळी यांनी आभार मानले.
फोटो : १० इस्लामपुर १
ओळ : इस्लामपूर येथे जायंटस ग्रुप ऑफ पर्ल आणि यंग ग्रुपचा शपथविधी झाला. यावेळी डॉ. राजकुमार पोळ, विश्वासराव साळुंखे, मानसी साळुंखे, श्रेया शिंदे, सुमन इटकरकर, डॉ. अनिल माळी उपस्थित होते.