मनोज शिंदे यांचे राजारामबापूंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:00+5:302021-08-13T04:30:00+5:30
राजारामनगर येथे मनोज शिंदे यांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील, आप्पासाहेब ...

मनोज शिंदे यांचे राजारामबापूंना अभिवादन
राजारामनगर येथे मनोज शिंदे यांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील, आप्पासाहेब हुळळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगली जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेले मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील यांनी शिंदे यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला.
यावेळी माजी सभापती आप्पासाहेब हुळळे, सांगली बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, संचालक वसंतराव गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य नरसिंह संगलगे, मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, शिवाजी महाडिक, महावीर खोत, सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच तुषार खांडेकर, रवींद्र बिसुरे, प्रणव पाटील, अविनाश केरीमनी उपस्थित होते.