अर्जुनवाड येथील संतोष खोत दुचाकीचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:50+5:302021-04-04T04:27:50+5:30
इस्लामपूर : येथील राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्य सोडत योजनेतील पहिल्या क्रमांकाच्या दुचाकीच्या बक्षिसाचे मानकरी शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडचे संतोष ...

अर्जुनवाड येथील संतोष खोत दुचाकीचे मानकरी
इस्लामपूर : येथील राजारामबापू दूध संघाच्या कृष्णा पशुखाद्य सोडत योजनेतील पहिल्या क्रमांकाच्या दुचाकीच्या बक्षिसाचे मानकरी शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडचे संतोष खोत हे ठरले; तर बाबासाहेब मोरे (चिकुर्डे) यांना टीव्ही मिळाला. रामचंद्र डेम्बरे (येडेनिपाणी : वॉशिंग मशीन), सदाशिव पाटील (निगवे-कोल्हापूर : आटाचक्की) हे इतर विजेते आहेत.
राजारामबापू दूध संघाच्यावतीने राजारामबापू पाटील यांची पुण्यतिथी ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस अशा १७ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या महिन्याभराच्या कालावधीत कृष्णा पशुखाद्य सोडत योजना काढली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बक्षिसांच्या भाग्यवान विजेत्यांची सोडत गुरुवारी ३१ मार्चला संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्याहस्ते काढण्यात आली.
इतर विजेत्यांमध्ये संदीप पवार (चिकुर्डे : सायकल), निवास यादव (मिक्सर), दीपक वाघमोडे (बोरगाव : इस्त्री), वैभव दाईंगडे (लाडेगाव : समृद्धी घमेले) यांचा समावेश आहे. यावेळी विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, कृष्णा पशुखाद्य हे उच्च दर्जाच्या गुणवत्तेचे आहे. जनावरांच्या प्रजनन क्षमतेचा विचार करून त्यांना सर्वप्रकारची खनिजे, प्रोटिन्स मिळावीत, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून हे पशुखाद्य बनविण्यात आले आहे. त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. पश्चिम महाराष्ट्रात या खाद्याला मोठी मागणी आहे.
यावेळी उपाध्यक्ष शशिकांत पाटील, संचालक विलास पाटील, रमेश पाटील, बबनराव सावंत, विकास कांबळे, अनिल खरात, अल्लाउद्दीन चौगुले, बजरंग खोत, पोपटराव जगताप, उज्वला पाटील, कार्यकारी संचालक बी. बी. भंडारी, उपसरव्यवस्थापक पी. डी. साळुंखे, पशुखाद्य विभागाचे व्यवस्थापक अधिकराव मोहिते उपस्थित होते. योजनेतील विजेत्यांना ३० एप्रिलपूर्वी आपली बक्षिसे घेऊन जाण्याचे आवाहन संघाने केले आहे.
फोटो : ०३ इस्लामपुर ३
ओळ : इस्लामपूर येथे राजारामबापू दूध संघाच्या कार्यस्थळावर विनायकराव पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी शशिकांत पाटील, विलास पाटील, उज्वला पाटील, बबनराव सावंत, बी. बी. भंडारी उपस्थित होते.