कोरोनावर मात केलेल्या मांगलेच्या आजोबांनी केली शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:44 IST2021-05-05T04:44:16+5:302021-05-05T04:44:16+5:30

मांगले (ता. शिराळा) येथे रत्नाकर कदम यांना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शिवाजी वाचनालयाच्यावतीने शुभेच्छा देताना अध्यक्ष प्रल्हाद पाटील. मांगले : गतवर्षी ...

Mangle's grandfather, who overcame Corona, crossed the hundred | कोरोनावर मात केलेल्या मांगलेच्या आजोबांनी केली शंभरी पार

कोरोनावर मात केलेल्या मांगलेच्या आजोबांनी केली शंभरी पार

मांगले (ता. शिराळा) येथे रत्नाकर कदम यांना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शिवाजी वाचनालयाच्यावतीने शुभेच्छा देताना अध्यक्ष प्रल्हाद पाटील.

मांगले : गतवर्षी कोरोनावर मात केलेले मांगले (ता. शिराळा) येथील रत्नाकर बळवंत कदम या आजोबांनी मंगळवारी शंभरीही पार केली. त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांनी सत्कार केला.

रत्नाकर कदम यांना गतवर्षी कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात त्यांनी कोरोनाशी संयमाने सामना करीत इतर रुग्णांना धीर देण्याचे काम केले होते. शंभराव्या वर्षात पदार्पण करतानाही त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करून कोरोनाकाळात काळजी घ्या, कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नका, असा सल्ला दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी त्यांचे पुत्र आदर्श सेवानिवृत्त शिक्षक सूर्यकांत कदम, चंद्रकांत कदम, प्रभाकर कदम, शुभम कदम यांच्या उपस्थितीत वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, ग्रंथपाल भगवान शेवडे, संचालक तुकाराम चौगुले, आनंदराव लायकर, ए. एस. नाडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी न विसरता सर्वांचे आभारही मानले.

Web Title: Mangle's grandfather, who overcame Corona, crossed the hundred