मांगले चोरीतील आरोपीकडून एटीएम फोडल्याचा गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST2020-12-05T05:08:01+5:302020-12-05T05:08:01+5:30

०३संतोष सिद्धू पुजारी/ ०३राहुल देवकर लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मांगले (ता. शिराळा) येथील डॉ. बी. एन. पाटील यांच्या ...

Mangle burglary accused reveals ATM burglary case | मांगले चोरीतील आरोपीकडून एटीएम फोडल्याचा गुन्हा उघड

मांगले चोरीतील आरोपीकडून एटीएम फोडल्याचा गुन्हा उघड

०३संतोष सिद्धू पुजारी/

०३राहुल देवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : मांगले (ता. शिराळा) येथील डॉ. बी. एन. पाटील यांच्या गंधा नर्सिंग होम रुग्णालयातील चोरीप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी राहुल उत्तम देवकर ( वय २४, रा. देवकर वसाहत, मांगले, ता. शिराळा) याच्याकडून मांगले येथीलच एटीएम फोडल्याचा गुन्हा उघडकीस आला असून, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन संशयित आरोपी फरारी आहेत.

याप्रकरणी संतोष सिधू पुजारी ( वय ३५, रा. वडणगे, सासणे मळा, ता. करवीर, जि. कोल्हापूर), सागर दिलीप चव्हाण (२५), राहुल उत्तम देवकर (२४, दोघे रा. मांगले) यांना अटक करण्यात आली आहे. पिंटू कांबळे, सनी टमके (दोघे रा. वडणगे), बाबू मिस्त्री (रा. मांगले) हे तिघे फरारी आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि.३१ डिसेंबर २०१९ च्या रात्री १२ ते १ जानेवारी २०२० च्या पहाटे ५:३० च्या दरम्यान टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडून एक लाखाचे यंत्र व एक लाख ४८ हजार ३०० असे दोन लाख ४८ हजार ३०० चा मुद्देमाल चोरून नेला होता. मांगले येथील डॉ. पाटील यांच्या घरातील चोरीप्रकरणी अटक केलेल्या उत्तम देवकर याच्याकडून एटीएम चोरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असून, तिघे फरारी आहेत. या संशयितांनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्याकडून विहिरीत टाकलेले एटीएम यंत्र आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले घरगुती गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, गॅस कटर, लोखंडी पहार आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Mangle burglary accused reveals ATM burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.