मणेराजुरी, वडगाव कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:42 IST2021-05-05T04:42:56+5:302021-05-05T04:42:56+5:30

तासगाव तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनारुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. मणेराजुरी येथे एका दिवसात २७, तर वडगाव येथे पंधरा ...

Manerajuri, Wadgaon Corona's 'Hotspot' | मणेराजुरी, वडगाव कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

मणेराजुरी, वडगाव कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

तासगाव तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनारुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. मणेराजुरी येथे एका दिवसात २७, तर वडगाव येथे पंधरा रुग्ण सापडले. ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने कोरोनाची साखळी तुटणार कशी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

सोमवारी तासगावात १७, अंजनी पाच, बस्तवडे एक, चिंचणी पाच, बोरगाव तीन, ढवळी एक, डोंगरसोनी दोन, कवठेएकंद आठ, कुमठे दोन, लोकरेवाडी पाच, मांजर्डे दोन, नागाव कवठे तीन, पेड पाच, राजापूर पाच, सावळज चार, सिद्धेवाडी एक, तुरची पाच, उपळावी तीन, वासुंबे पाच, विसापूर दोन, वायफळे एक आणि येळावी येथे सहा कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सोमवारी एकूण २९७ संशयितांची तपासणी करण्यात आली होती. १२५ जण कोरोनामुक्त झाले. ९८२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: Manerajuri, Wadgaon Corona's 'Hotspot'