ढालगावमधील शूटिंग बॉल स्पर्धेत मणेराजुरी संघास विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:22+5:302021-08-24T04:30:22+5:30
ओळ : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शूटिंग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन सभापती विकास हाक्के, कुमार पाटील, जनार्दन देसाई यांच्याहस्ते झाले. ...

ढालगावमधील शूटिंग बॉल स्पर्धेत मणेराजुरी संघास विजेतेपद
ओळ : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शूटिंग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन सभापती विकास हाक्के, कुमार पाटील, जनार्दन देसाई यांच्याहस्ते झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ ) येथील नानासाहेब पाटील (पोलीस) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयाेजित शूटिंग बाॅल स्पर्धेत मणेराजुरीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
अहिल्यादेवी होळकर चौकात नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सभापती विकास हाक्के, जनार्दन देसाई यांच्याहस्ते झाले. यावेळी दिलावर मणेर, सुभाष खांडेकर, हिंमतराव साळुंखे, भगवान वाघमारे, अभिजीत मायणे, विजयराव घागरे, दिलीप झुरे, पोपट धोकटे, इलाही तांबोळी, भारत ढोबळे, संजय घागरे, बापूराव खुटाळे, कुमार पाटील, सुरेश घागरे, अशोक घोदे, बबलू घोदे उपस्थित हाेते. शूटिंग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन विकास हाके यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील १४ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. ग्रामीण स्पर्धेत १० संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत खानापूर संघाने द्वितीय, धरणगुत्ती संघाने तृतीय तर, कडेपूर (डाेंगराई) संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना रोख बक्षीस व चषक देण्यात आले. स्पर्धा पार पाडण्यासाठी सांगली खेळाडू संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, राष्ट्रीय खेळाडू खाशाबा यादव, सचिन पाटील, नितीन पाटील, रमजान मुल्ला, महेश माने, संभाजी भानुसे, हनमंत पवार, किरण पवार यांचे सहकार्य लाभले.