मानवमित्र संघटनेची तिकोंडी जळीतग्रस्त कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:25 IST2021-03-25T04:25:07+5:302021-03-25T04:25:07+5:30
संख : तिकोंडी (ता. जत) येथील काशीबाई बसाप्पा चौधरी यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात लाखांचे ...

मानवमित्र संघटनेची तिकोंडी जळीतग्रस्त कुटुंबाला मदत
संख : तिकोंडी (ता. जत) येथील काशीबाई बसाप्पा चौधरी यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात लाखांचे नुकसान झाले. मानवमित्र संघटनेने जळीतग्रस्त पीडित कुटुंबाला आर्थिक मदत केली.
तिकोंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्तीवर काशीबाई चौधरी या कुटुंबासहित राहतात. आगीत घर, रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य, द्राक्षबागेची औषधें, सोने, चांदी, कडधान्ये जळून खाक झाली. ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजता झाली होती.
गॅस सिलिंडरच्या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तुकारामबाबा महाराज यांच्या मानवमित्र संघटनेने जळीतग्रस्त पीडित कुटुंबाला आर्थिक मदत दिली.
यावेळी तिकोंडीचे मानवमित्र संघटनेचे रायगोंडा राचगोंड, उपसरपंच बसवराज पाटील, सदाशिव पाटील, भिवर्गीचे संतोष व्हनमोरे उपस्थित होते.