येळदरीत मानवमित्र संघटनेची जळीतग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:52+5:302021-03-27T04:26:52+5:30

संख : येळदरी (ता. जत) येथील सिद्राम माने यांच्या झोपडीला आग लागून सात लाखांचे नुकसान झाले. या कुटुंबाला ...

Manavmitra organization helps the burnt victims in Yeldari | येळदरीत मानवमित्र संघटनेची जळीतग्रस्तांना मदत

येळदरीत मानवमित्र संघटनेची जळीतग्रस्तांना मदत

संख : येळदरी (ता. जत) येथील सिद्राम माने यांच्या झोपडीला आग लागून सात लाखांचे नुकसान झाले. या कुटुंबाला मदत म्हणून श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने माने कुटुंबीयांना चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.

येळदरीपासून एक किलोमीटर अंतरावर बिळूर रस्त्यावर सिद्राय्या माने हे कुटुंबासह राहतात. त्यांचे झोपडीवजा कुडाचे घर आहे. वाऱ्याने चुलीतील विस्तव उडून कुडाने पेट घेतला. या आगीत संसारोपयोगी साहित्य, रोख चार लाखांची रक्कम, दोन तोळे सोने, शेळी, दोन कोकरे जळून खाक झाली. हे कुटुंब उघड्यावर पडले होते.

ही घटना समजताच श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यांनी धीर देत रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य दिले.

यावेळी मंडल अधिकारी संदीप मोरे, मानवमित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सूरज मणेर, विक्रम कांबळे, अमोल कुलकर्णी, तुकाराम बंडगर, शिवाजी देवकते, बाबा शिंदे, संभाजी सरगर, राजेंद्र पाटील उपस्थित होते.

Web Title: Manavmitra organization helps the burnt victims in Yeldari