शिराळ्यातील मनस्वीचा पहिला पगार कोरोनाग्रस्तांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:37+5:302021-05-08T04:26:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : पहिला पगार एक जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असतो, मात्र वडिलांचे कोरोनाने निधन झाले. ...

शिराळ्यातील मनस्वीचा पहिला पगार कोरोनाग्रस्तांसाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : पहिला पगार एक जीवनातील मोठा आनंदाचा क्षण असतो, मात्र वडिलांचे कोरोनाने निधन झाले. आपल्यावर जो प्रसंग आला तो कोणावरही येऊ नये यासाठी मदत व्हावी ही भावना ठेवून आपला पहिला पगार मुख्यमंत्री निधीस देण्याचे एक वेगळे कार्य मनस्वी रघुनाथ निकम हिने केले आहे.
मनस्वी या पुणे येथील खासगी कंपनीत प्रोग्रामर अनलिस्ट म्हणून काम करीत आहेत. त्यांचे वडील रघुनाथ निकम हे पुणे येथे गणेश सहकारी बँकेचे शाखाधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते, तर त्यांची आई संध्याराणी निकम शिराळा तहसीलदार कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करीत आहेत.
मनस्वी हिला पुण्यात नोकरी मिळाली. तिचा पहिला पगार आल्यावर सर्व कुटुंब भावनावश झाले. या आनंदाच्या क्षणी मात्र वडील हवे होते असे वाटत होते. हा आनंदाचा क्षण आपणामुळे दुसऱ्या एखाद्या कुटुंबाला मिळावा असा विचार करून मनस्वी, तिची आई संध्याराणी, भाऊ सुयश यांनी हा पगार मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वाळवा तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे आपल्या पगाराची सर्व रकमेचा धनादेश दिला.