हॉटेलवरील वेश्या अड्ड्याचा व्यवस्थापक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:45+5:302021-02-05T07:22:45+5:30
अनैतिक मानवी व्यापार कक्ष आणि सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरवर छापा टाकून सुरू असलेला हायप्रोफाईल ...

हॉटेलवरील वेश्या अड्ड्याचा व्यवस्थापक ताब्यात
अनैतिक मानवी व्यापार कक्ष आणि सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने कर्नाळ रस्त्यावरील हॉटेल रणवीरवर छापा टाकून सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्या अड्डा उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत दोन महिलांनाही ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईत हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, त्याचा भाऊ रवींद्र ऊर्फ रविआण्णा कोरागा शेट्टी, व्यवस्थापक यादव, ग्राहक म्हणून असलेला पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सत्यजित पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवकर, पंडित आणि एजंट शिवाजी नारायण गोंधळे ऊर्फ वाघळे यांना अटक करण्यात आली होती, तर तिघे पसार होते. शनिवारी व्यवस्थापक यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आटपाडी पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण देवकर हॉटेलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती. कारवाईत पोलीसच सापडल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तत्काळ दखल घेत शिस्तभंगाची कारवाई केली होती. आता निलंबनाबाबतचा निर्णय विशेष पोलीस महानिरीक्षक घेणार आहेत.
चौकट
हॉटेल होणार सील
बेकायदेशीरपणे वेश्या अड्डा चालविणाऱ्या हॉटेल रणवीरवरही आता कारवाई होणार आहे. पोलिसांच्यावतीने हॉटेल सील करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हॉटेल सील करण्यात येणार आहे.