शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांचा कारभारच त्यांच्या पतनाला कारण ठरेल : विनायक शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:49+5:302021-02-10T04:27:49+5:30
ते पुढे म्हणाले, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सभासद हिताचा कारभार सत्ताधाऱ्यांनी कधीही केला नाही. याउलट सभासदांच्या खिशाला सत्ताधाऱ्यांनी ...

शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांचा कारभारच त्यांच्या पतनाला कारण ठरेल : विनायक शिंदे
ते पुढे म्हणाले, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये सभासद हिताचा कारभार सत्ताधाऱ्यांनी कधीही केला नाही. याउलट सभासदांच्या खिशाला सत्ताधाऱ्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने कात्रीच लावलेली आहे. इमारत खरेदी- दुरुस्ती, संगणक खरेदी - दुरुस्ती, स्टेशनरी खरेदी-छपाई, टेलिफोन इंटरनेट बिल, कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढलेला असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचे सभासद हिताविरोधी धोरण शिक्षकांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे शिक्षक संघाला सभासदांचा वाढता पाठिंबा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिक्षक समितीला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव म्हणाले, लवकरच जिल्ह्यामध्ये शिक्षक संघाच्यावतीने परिवर्तन रॅली काढून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा सर्वांसमोर केला जाईल. अकरा वर्षाच्या सत्ताकाळात शिक्षक समितीने संचालक व त्यांचे बगलबच्चे यांचेच हित साधल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, अरुण पाटील, हंबीरराव पवार, तानाजी खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिक्षक समितीच्या शिक्षक बँकेतील भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून शिक्षक समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते गजानन दौंडे यांनी शिक्षक समितीतून शिक्षक संघामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी श्रीकांत पवार, सुधाकर पाटील, सुरेश खारकांडे, धनंजय नरुले, फत्तू नदाफ, अशोकराव पाटील, शशिकांत मानगावे यांच्यासह शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, बँकेचे संचालक, राज्य व जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य शिक्षक उपस्थित होते.