मणेराजुरीत चाकूहल्ल्यातील मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST2021-02-05T07:18:25+5:302021-02-05T07:18:25+5:30

मणेराजुरी : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे शुक्रवारी शाळकरी मुलांमधील भांडणात जखमी झालेल्या अक्षय बाबासाहेब चव्हाण (१८) याचा उपचारादरम्यान मृत्यू ...

Man stabbed to death in Manerajuri | मणेराजुरीत चाकूहल्ल्यातील मुलाचा मृत्यू

मणेराजुरीत चाकूहल्ल्यातील मुलाचा मृत्यू

मणेराजुरी : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे शुक्रवारी शाळकरी मुलांमधील भांडणात जखमी झालेल्या अक्षय बाबासाहेब चव्हाण (१८) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मणेराजुरीत शुक्रवारी रात्री तिघांनी अक्षय चव्हाण यास चाकूने भोसकले होते. या घटनेनंतर मणेराजुरीत तणावाचे वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृत अक्षय चव्हाण याच्या मृतदेहावर शनिवारी पहाटे तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी व बारावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचे एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्यातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हे भांडण खूनापर्यंत गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या तिघांनी नेमका कोणत्या कारणातून हा खून केला. याचा पोलीस तपास करत आहेत.

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षका अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

या घटनेचे गांभीर्य ओळखून तासगाव पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह पथकाने तपास करून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. पोलीस अधिकारी नितीन कोराम. व्ही. एस. मोहिते. हणमंत गवळी. हवालदार माने आदींनी कारवाई केली. अधिक तपास नितीन कोराम करीत आहेत.

फोटो-३०अक्षय चव्हाण

Web Title: Man stabbed to death in Manerajuri