इटकरे येथील एकास सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:52+5:302021-09-25T04:27:52+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील शेतमजूर महिलेचा विनयभंग करणाऱ्या इटकरे येथील करीम ईलाही मुलाणी या आरोपीस दोषी धरून ...

इटकरे येथील एकास सहा महिने कारावास
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातील शेतमजूर महिलेचा विनयभंग करणाऱ्या इटकरे येथील करीम ईलाही मुलाणी या आरोपीस दोषी धरून येथील सातवे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी सहा महिने कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विनयभंगाची ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. आरोपी मुलाणी याने शेतमजूर महिला शेतात काम करीत असताना तिच्यासमोर बांधावर थांबून अश्लील चाळे केले होते. याबाबत कुरळप पोेलिसांत विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. पोलीस उपनिरीक्षक एम. एच. शेख यांनी तपास करून मुलाणी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादीतर्फे सरकारी वकील बी. एस. मोरे यांनी काम पाहिले. पोलीस कर्मचारी एस. वाय. सिद्ध यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.