पणुब्रे वारुण येथे दारू विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:49+5:302021-07-21T04:18:49+5:30

कोकरुड : पणुब्रे वारुण (ता.शिराळा) येथे घराच्या आडोशाला अवैध दारू विक्री करणाऱ्या सुभाष आनंदा पवार (वय ४५, रा.पवार गल्ली, ...

Man arrested for selling liquor at Panubre Varun | पणुब्रे वारुण येथे दारू विक्री करणाऱ्यास अटक

पणुब्रे वारुण येथे दारू विक्री करणाऱ्यास अटक

कोकरुड : पणुब्रे वारुण (ता.शिराळा) येथे घराच्या आडोशाला अवैध दारू विक्री करणाऱ्या सुभाष आनंदा पवार (वय ४५, रा.पवार गल्ली, पणुब्रे वारुण, ता. शिराळा) यास अटक करण्यात आली. त्यास दारूचा पुरवठा करणाऱ्या नीलेश वसंत कांबळे (रा.शेडगेवाडी फाटा, ता.शिराळा) यास ताब्यात घेऊन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष आनंदा पवार हा पवार गल्लीतील आपल्या राहत्या घराच्या आडोशाला दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलीस सुहास डाकवे यांना मिळाली. त्यांनी तेथे छापा टाकून कारवाई केली. यावेळी सुभाष पवार याने ‘हा माझा धंदा नसून, मी नीलेश कांबळे यांच्याकडे तीनशे रुपये हजेरीवर देशी दारूची विक्री करताे,’ असे सांगितले. यावेळी सुभाष पवार यांच्याकडील १८० मिलीच्या २० प्लास्टीक बाटल्या, रोख पन्नास रुपये असा १,२६० रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. दारू पुरवठा करणारा संशयित नीलेश कांबळे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Web Title: Man arrested for selling liquor at Panubre Varun