अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास चार महिन्यानंतर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:29+5:302021-04-09T04:29:29+5:30

आटपाडी : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून चार महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितास आटपाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. स्वप्नील ...

Man arrested for molesting minor girl four months later | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास चार महिन्यानंतर अटक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास चार महिन्यानंतर अटक

आटपाडी : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून

चार महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितास आटपाडी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. स्वप्नील बाळकृष्ण माने (वय २६, रा. काळचौंडी, ता. माण, जि. सातारा) याला पोलिसांनी वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथून पैलवानाच्या तालमीतून शिताफीने अटक केली.

तालुक्यातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मुलीला अडवून स्वप्नील माने तिचा पाठलाग करत होता. प्रवेशद्वारावर तिचा विनयभंग केला होता. तिचा आणि स्वतःचा फोटो व्हाॅट्सॲप स्टेटसला ठेवून व्हायरल केला होता. दि. २४ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी मुलीने म्हसवड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने इकडे तपास वर्ग करण्यात आला होता. तेव्हापासून माने पोलिसांना गुंगारा देत होता. गुरुवारी दुपारी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार विजय कदम, राहुल क्षीरसागर, महेश कोरे यांच्या पथकाने वेळापूर येथील पहिलवानांच्या तालमीत स्वप्नील माने यास अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Man arrested for molesting minor girl four months later