अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास नऊ महिन्यांनी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:47+5:302021-08-25T04:31:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : अल्पवयीन मुलीस शेतात सोडण्याचे आमिष दाखवित तिला दुचाकीवरून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास नऊ महिन्यांनी अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : अल्पवयीन मुलीस शेतात सोडण्याचे आमिष दाखवित तिला दुचाकीवरून घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली होती. तेव्हापासून संशयित फरारी होता.
नीलेश संजय गिरीगोसावी (वय २४, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर मुलीस त्रास होऊ लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर ही बलात्काराची घटना उघडकीस आली. पीडित मुलीने स्त्री जातीच्या नवजात बालिकेला जन्म दिला आहे. घटना घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नीलेशला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.