येडेनिपाणीत मल्लिकार्जुन यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST2021-03-05T04:27:22+5:302021-03-05T04:27:22+5:30

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थानची ११ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने होणारी यात्रा व १४ ...

Mallikarjun Yatra canceled in Yedenipani | येडेनिपाणीत मल्लिकार्जुन यात्रा रद्द

येडेनिपाणीत मल्लिकार्जुन यात्रा रद्द

कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थानची ११ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्ताने होणारी यात्रा व १४ मार्चची पालखी यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती गोरखनाथ गुरव यांनी दिली.

कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, हवालदार बाजीराव भोसले यांच्या उपस्थितील गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व सण, उत्सव महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात आलेले आहेत. यात्रेतील गर्दीमुळे जंतुसंसर्ग वाढू नये म्हणून मल्लिकार्जुनची चार दिवस होणारी, महाशिवरात्री ते पालखीपर्यंतची यात्रा रद्द करण्यात आली आहे. सर्व शिवभक्तांनी नोंद घ्यावी. कोणीही दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

Web Title: Mallikarjun Yatra canceled in Yedenipani