मल्लिकार्जुन मंदिर रस्त्यालगतचे बल्ब पुन्हा लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:31+5:302021-06-30T04:17:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कामेरी : श्री मल्लिकार्जुन देवस्थान सेवा मंडळाने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांत खांबावर बल्ब लावले ...

मल्लिकार्जुन मंदिर रस्त्यालगतचे बल्ब पुन्हा लावले
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : श्री मल्लिकार्जुन देवस्थान सेवा मंडळाने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांत खांबावर बल्ब लावले होते. पहाटेच्या वेळी दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना याचा चांगला उपयोग होत होता. मात्र, आठवड्याभरापूर्वी काही समाजकंटकाकडून हे बल्ब फोडण्यात आले होते. मात्र, सेवामंडळ सदस्यांनी पुन्हा नवीन बल्ब लावण्यास सुरुवात केली आहे.
काही ठिकाणी वायरी तोडल्यामुळे त्याच्याही दुरुस्तीचे काम अजून चालू आहे. यासाठी काही दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे शिवभक्त बाबासो नायकवडी, किशोर पाटील, विजय पाटील, जगदीश पाटील, बाबासो पाटील, वसंत पाटील, गजानन पाटील यांचा समावेश आहे. देणगीदारांनी लगेच दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे सर्व बल्ब देण्याची व्यवस्था केली. मल्लिकार्जुन सेवा मंडळाच्या सदस्यांनी लगेच ते खांबावर लावण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती सेवा मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ गुरव यांनी दिली.