मल्लिकार्जुन माने यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST2021-02-20T05:17:23+5:302021-02-20T05:17:23+5:30

उपजिल्हाधिकारी माने यांनी मुंबई उपनगर व परिसरात कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. शहरातील ...

Mallikarjun Mane honored by the Governor | मल्लिकार्जुन माने यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

मल्लिकार्जुन माने यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

उपजिल्हाधिकारी माने यांनी मुंबई उपनगर व परिसरात कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. शहरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने तेथे जाऊन रुग्णाला कोविड सेंटरपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. तसेच वेळोवेळी आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या संपर्कात राहून परिस्थितीबाबत अवगत केले. या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने एका समारंभात उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले.

माने हे मूळचे उमदीचे रहिवासी आहेत. मल्लिकार्जुन माने यांची एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तहसीलदार म्हणून नागपूर येथे निवड झाली. रत्नागिरी जिल्हा राजापूर, पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून काम केले. कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. याशिवाय सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड जिल्हा प्रांत अधिकारी, रायगड (अलिबाग), सातारा जिल्हा प्रांत अधिकारी आणि कोरेगाव प्रांत अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता मुंबई उपनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत.

फाेटाे : १९ उमदी १

ओळ : मुंबई येथे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांचा राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Mallikarjun Mane honored by the Governor