बेकायदेशीर कामांसाठीच उपसरपंचांकडून मालगावची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:18+5:302021-09-15T04:32:18+5:30
मालगावच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीत गैरकारभार सुरू असल्याची व मनमानी करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांच्या बदलीचा ठराव झाल्याची ...

बेकायदेशीर कामांसाठीच उपसरपंचांकडून मालगावची बदनामी
मालगावच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीत गैरकारभार सुरू असल्याची व मनमानी करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे यांच्या बदलीचा ठराव झाल्याची माहिती उपसरपंच खांडेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. यावर सरपंच क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला आहे.
त्या म्हणाल्या की, ग्रामसभा खेळीमेळीत पार पडली. नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना आपण व ग्रामविकास अधिकारी कोरे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. मात्र उपसरपंच खांडेकर यांनी दिलेली माहिती चुकीची आहे. तसा कोणताही प्रकार सभेत घडलेला नाही. घरपट्टी, पाणीपट्टीची विक्रमी वसुली होत आहे. बेकायदेशीर कामे होत नसल्याचा द्वेष मनात ठेवून उपसरपंच खांडेकर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करीत आहेत. खांडेकर यांच्या आरोप व मागणीशी एकही सदस्य सहमत नाहीत. ग्रामपंचायतीचा कारभार करण्यास आपण सक्षम आहे. माझ्या पतींचा कारभारात कोणताच हस्तक्षेप नाही. यापुढे बदनामी खपवून घेतली जाणार नाही.
चौकट
बेकायदेशीर कामांचा पंचनामा करू
सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना बदनाम करुन आपली पोळी भाजून घेण्याचा उपसरपंच खांडेकर यांनी प्रयत्न करू नये. अन्यथा लाभार्थ्यांकडून पैसे उकळण्यासाठी नेमलेल्या एजंटासह अन्य बेकायदेशीर कामांचा जाहीर पंचनामा करावा लागेल, असा इशारा सरपंच क्षीरसागर यांनी दिला आहे.