एमआयडीसीतील कामगारांना लस उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST2021-04-13T04:26:18+5:302021-04-13T04:26:18+5:30

फोटो ओळ : सांगली भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी यांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवेदन दिले. यावेळी ...

Make the vaccine available to MIDC workers | एमआयडीसीतील कामगारांना लस उपलब्ध करून द्या

एमआयडीसीतील कामगारांना लस उपलब्ध करून द्या

फोटो ओळ : सांगली भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत चाैधरी यांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवेदन दिले. यावेळी शरद नलवडे, रमेश आरवाडे, नाना कांबळे आदी उपस्थित होते.

कुपवाड : सांगली, मिरज, आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना शासनाने कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप उद्योग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी लावली आहे. लाॅकडाऊन लावत असताना सूक्ष्म व लघू उद्योग चालू ठेवायला सांगून व्यापार बंद करायचा आदेश काढला आहे, पण हे लघू उद्योग चालवायला कच्चा माल, इलेक्ट्रिकल पार्ट, स्पेअर पार्ट, टुल्स यांची विक्री करणारी दुकाने बंद असल्याने, उद्योगांना लागणारा कच्चा माल व साहित्य उपलब्ध होणे मुश्कील असल्याने, सरकारचे धोरण हे व्यवसाय व व्यावसायिक यांना मोडीत काढण्याचे आहे.

सध्या या व्यवसायात काम करणारे बरेच मजूर हे परराज्यातील आहेत. हे व्यवसाय बंद पडले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. जर हे मजूर आपल्या गावाला निघून गेले, तर परत व्यवसाय कोलमडून पडणार आहे, तसेच एमआयडीसीतील कामगारांना कोरोना लस उपलब्ध करून आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून ते कामगारांना देण्याचा निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी उद्योग आघाडी महानगरचे सयोजक शरद नलवडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश आरवाडे, नाना कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Make the vaccine available to MIDC workers