पीक नुकसानीचे पंचनामे करा

By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T21:58:04+5:302014-11-11T00:05:06+5:30

जि. प. कृषी समिती सभा : अधिकाऱ्यांना आदेश

Make a crop loss | पीक नुकसानीचे पंचनामे करा

पीक नुकसानीचे पंचनामे करा

सांगली : अवकाळी पावसाने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्यात यावेत, यासाठी शासनाला शिफारस करण्यात यावी, असा निर्णय आज (बुधवार) येथे झालेल्या जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती मनीषा पाटील होत्या.
अवकाळी पावसाने द्राक्ष, भात, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, तसा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात यावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्याचबरोबर विशेष घटक योजनेअंतर्गत विहिरीसाठी एक लाख अनुदान देण्यात येत असून, ते तीन लाख करण्यात यावे, असा ठरावही यावेळी करण्यात आला. बायोगॅस योजनेअंतर्गत शौचालयासाठी एक हजार अनुदान देण्यात येते, त्यासाठी आता स्वच्छ भारत अभियानामधून अनुदान देण्यात यावे, असा निर्णयही यावेळी झाला.
जिल्ह्यातील ८४० शेतकऱ्यांनी विशेष घटक योजनेतून विहिरी काढल्या असून, त्यांना अद्याप वीज कनेक्शन देण्यात आलेले नाही. त्यांना वीज कनेक्शन घेण्यासाठी तात्काळ अनुदान देण्याचाही आदेश देण्यात आला. (प्रतिनिधी)

उपाध्यक्षांसह सभापतींना वाहने मिळणार
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांसह तीन सभापतींना अद्याप वाहने मिळालेली नाहीत. त्यांना वाहने उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. येत्या आठवड्याभरात या तिघांना नव्या चारचाकी मिळणार असल्याची माहिती आज प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Web Title: Make a crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.