जिगरी मित्रानेच काढला मैनुद्दीनचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:42+5:302021-02-05T07:21:42+5:30

सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून त्याच्या जिगरी मित्राने केल्याचे ...

Mainuddin's thorn was removed by his best friend | जिगरी मित्रानेच काढला मैनुद्दीनचा काटा

जिगरी मित्रानेच काढला मैनुद्दीनचा काटा

सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून त्याच्या जिगरी मित्राने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पैशाच्या देवघेवीतून तिघा साथीदारांच्या मदतीने हा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. संशयितांना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अटक केलेल्यांमध्ये रवि हरी चंडाळे (वय ३६, रा. शिवाजी मंडई), शफीक अजमुद्दीन खलिफा (वय ४५, रा. जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना ऊर्फ बाळासाहेब दादासाहेब पुळके (वय ३७, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), आप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी (वय ३६, रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी) या चौघांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत मैनुद्दीन मुल्ला आणि आप्पा वाणी हे दोघे जिगरी मित्र होते. त्यांच्यात पैशाच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद होत होता. वाणीने मुल्लाला काही रक्कम दिली होती. ती रक्कम तो मुल्लाकडे परत मागत होता. मात्र, मुल्ला पैसे देण्यास असमर्थ होता. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्यामुळे संशयितांनी संगनमताने मुल्लाचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यापूर्वी मुल्लावर दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी कट रचला. मुल्ला हा गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. दरम्यान, यावेळी संशयित शफीक खलिफा हाही यात जखमी झाला. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. मुल्लाच्या खुनाला पैशाच्या देवघेवीचेच कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकट

पुकळेला बनायचे होते ‘दादा’

मैनुद्दीन मुल्ला खूनप्रकरणातील संशयित आरोपी नाना पुकळे याला ‘दादा’ बनायचे होते. त्यामुळे त्याने हल्लेखोरांना साथ दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तर यातील संशयित आरोपी शफीक खलिफा यालाही त्याच्या कामाचा मोबदला मिळणार होता. मात्र, हे सर्वजण मुल्ला खुनात सहभागी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Web Title: Mainuddin's thorn was removed by his best friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.