विश्रामबागमधील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:39+5:302021-01-13T05:10:39+5:30
सांगली : विश्रामबाग परिसरात स्वा. सावरकर प्रतिष्ठाणजवळ खुल्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवा, असे साकडे मंगळवारी शाळेचे शिक्षक ...

विश्रामबागमधील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवा
सांगली : विश्रामबाग परिसरात स्वा. सावरकर प्रतिष्ठाणजवळ खुल्या भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण कायम ठेवा, असे साकडे मंगळवारी शाळेचे शिक्षक व पालकांनी महापालिकेला घातले. यावेळी महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांना निवेदनही देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक म. कृ. कुंभार, पालक प्रतिनिधी स्नेहा चौंदीकर, दीपा देशपांडे, पूनम कुलकर्णी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सावरकर प्रतिष्ठाणतर्फे बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक अशा तीन शाळा चालविल्या जातात. शाळेजवळच खुल्या भूखंडावर शैक्षणिक आरक्षण आहे. शाळेला क्रीडांगणाची गरज आहे. २००० सालापर्यंत हा खुला भूखंड संस्थेच्या ताब्यात होता, तर २०१८ पर्यंत या भूखंडाचा क्रीडांगण म्हणून वापर होत होता; पण आता या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिसरातील शैक्षणिक सुविधांचा विचार करता हे आरक्षण उठविणे गैरसोयीचे होणार आहे. जागेच्या मालकी हक्काबाबत न्यायिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अथवा शासनाच्या फेरसर्वेक्षण होईपर्यंत आरक्षण कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.