सांगली : धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगलीच्याजिल्हाधिकारीपदी नियुक्ती शुक्रवारी झाली. सध्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. ते डॉ. मंगेश गोंदावले यांची जागा घेतील.२०१९ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. घोष यांनी बायोकेमिस्ट्री विषयात पीएचडी केली आहे.त्यांनी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आपल्या पारदर्शी कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली होती.
सप्टेंबर २०२५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी तुळजापूरसह पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन मदतकार्याचे नेतृत्व केले. या घटनेमुळे त्यांच्या संवेदनशील आणि जबाबदार प्रशासकीय दृष्टिकोनाची राज्यभर दखल घेतली गेली होती.
Web Summary : Dr. Mainak Ghosh, formerly CEO of Dharashiv Zilla Parishad, appointed Sangli's District Collector. Ashok Kakade transferred. Ghosh, a 2019 IAS officer, known for transparency, led flood relief efforts after personal loss, showcasing sensitivity and responsibility.
Web Summary : धाराशिव जिला परिषद के पूर्व सीईओ डॉ. मैनाक घोष सांगली के जिला कलेक्टर नियुक्त। अशोक काकड़े का तबादला। 2019 बैच के आईएएस अधिकारी घोष पारदर्शिता के लिए जाने जाते हैं। व्यक्तिगत नुकसान के बाद बाढ़ राहत प्रयासों का नेतृत्व किया, संवेदनशीलता दिखाई।