जिल्ह्यात २१६ गावांत येणार महिलाराज (२१६ की २१४ ठिकाणी महिलाराज? एकदा वाचून घ्यावे...)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:48+5:302021-02-05T07:22:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी तालुक्याच्या ठिकाणी सोडत पद्धतीने काढण्यात आले. यात जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार ...

जिल्ह्यात २१६ गावांत येणार महिलाराज (२१६ की २१४ ठिकाणी महिलाराज? एकदा वाचून घ्यावे...)
सांगली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी तालुक्याच्या ठिकाणी सोडत पद्धतीने काढण्यात आले. यात जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज येणार असून, २१६ ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी घोषित झाले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसह आगामी निवडणुकांसाठीही आरक्षण घोषित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येत असलेतरी यावेळी कोरोनामुळे निवडणूक कार्यक्रम अगोदरच जाहीर झाल्याने यावेळी निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे. याशिवाय पुढील वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचेही आरक्षण घोषित करण्यात आले आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील २१६ गावांतील सरपंचपद सर्वसाधारणसाठी जाहीर झाले आहे तर २१४ ठिकाणी महिलांसाठी असणार आहे. याशिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, अनुसूचित जाती व जमातीसाठीही आरक्षण घोषित करण्यात आले आहे. तालुका पातळीवर ही सोडत काढण्यात आली. यावेळी इच्छुकांनी गर्दी केली होती.