महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास मिळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:09+5:302021-01-19T04:29:09+5:30

ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सरकारने हाताळलेली परिस्थिती व जनहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय यामुळे जनतेचा सरकारवर ठाम विश्वास ...

Mahavikas Aghadi won the trust of the people | महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास मिळविला

महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास मिळविला

ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सरकारने हाताळलेली परिस्थिती व जनहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय यामुळे जनतेचा सरकारवर ठाम विश्वास आहे. सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे, हे ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट दिसते. जिल्ह्यातही चांगले व अपेक्षित यश मिळाले आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे आशीर्वाद, आमदार मोहनराव कदम यांचे मार्गदर्शन आणि जनतेच्या सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत. यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींची सत्ता मिळविण्यात यश आले. लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने व अविरतपणे केलेल्या कामाची, महापूर, अतिवृष्टी, कोरोना अशा संकटकाळात जनतेच्या सुरक्षिततेसाठी केलेले सर्वोतोपरी प्रयत्न, रोजगारनिर्मिती, शैक्षणिक सुविधा, मतदारसंघात केलेली विकासकामे याची पोहोचपावती मतदारसंघातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालातूनही मला दिली.

फोटो : विश्वजित कदम यांचा फोटो वापरणे.

Web Title: Mahavikas Aghadi won the trust of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.