शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 20:23 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार विश्वजीत कदम यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल ४ नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता, आजपासून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विश्वजीत कदम निवडणूक लढवत आहेत, त्यांनी पलूसमधून प्रचार सभा सुरु केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीवर टीका केली. 

कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...

आमदार विश्वजीत कदम यांनी यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर निशाणा साधला. विश्वजीत कदम म्हणाले, महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती आहे, फसून जाऊ नका. कर्नाटकात काँग्रेसने २ हजार रुपये दिले. राहुल गांधी यांनी ही योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कायम चालू  ठेवणार असं सांगितलं आहे. या योजनेत आम्ही पैसे वाढवून देणार आहे, असंही विश्वजीत कदम म्हणाले. 

सांगली विधानसभेत विशाल पाटलांचा जयश्री पाटलांना पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली. अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसला ही जागा मिळाली नाही. अखेर इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर या सांगली पॅटर्नची चर्चा राज्यभरात झाली. विधानसभा निवडणुकीतही सांगली पॅटर्नची चर्चा आहे. अनेक ठिकाणी हा पॅटर्न राबवण्याकडे उमेदवारांचा कल असल्याचेही पाहायला मिळत आहे. यातच आता विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जयश्री पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.

जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार

जयश्री पाटील यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीची उमेदवारी आहे, असे मी जाहीर करतो. कारण मी खासदार म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. जसे लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार निवडून आले आणि शंभरावा मी  होतो, तसे जयश्री पाटील शंभराव्या आमदार असतील. आता संघर्ष संपला पाहिजे ही आमची भूमिका होती. जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला? का न्याय मिळत नाही हे कळत नाही. जयश्री पाटील लोकसभेला सर्वात पुढे होत्या. मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये? ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून याच विकास आघाडीचा घटक आहे, असे विशाल पाटील म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vishwajeet Kadamविश्वजीत कदमElectionनिवडणूक 2024palus-kadegaon-acपलूस कडेगाव