शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:05 IST

railway Panjab Sangli Kolhapur : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, पण ती मंजूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा पंजाबसोबत थेट संपर्क होणार आहे.

ठळक मुद्देअमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसथेट पंजाबसाठी धावणार पहिलीच एक्सप्रेस

संतोष भिसेसांगली : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेनेरेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, पण ती मंजूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा पंजाबसोबत थेट संपर्क होणार आहे.प्रस्तावानुसार अमृतसरमधून प्रत्येक मंगळवारी व शनिवारी निघेल, तर कोल्हापुरातून सोमवारी व गुरुवारी निघेल. अमृतसरमधून सकाळी १०.१० वाजता निघालेली एक्सप्रेस जालंधर, लुधियाना, अंबाला, नवी दिल्ली, कोटा, वडोदरा, कल्याण, पुणे, सातारा, मिरजमार्गे कोल्हापुरला दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता पोहोचेल. कोल्हापुरातून सकाळी ७.०५ वाजता निघून याच मार्गाने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वापाच वाजता अमृतसरला पोहोचेल.२२ बोगींच्या एक्सप्रेसला ४ जनरल. नऊ स्लीपर, एक पेन्ट्री, चार थ्री टायर वातानुकुलीत, एक टू टायर वातानुकुलीत आणि एक प्रथमवर्ग कम द्वितीय श्रेणी वातानुकुलीत डबा असेल. अमृतसर ते पुणेदरम्यान विजेच्या इंजिनावर तर पुण्यापासून कोल्हापुरपर्यंत डिझेल इंजिनावर धावेल. अमृतसरमध्ये परतल्यानंतर ही गाडी भागलपुरसाठी आठवड्यातून दोनवेळा धावणार आहे.पंजाबसाठी पहिलीच एक्सप्रेसपश्चिम महाराष्ट्रातून थेट पंजाबसाठी ही पहिलीच एक्सप्रेस असेल. यापूर्वी यशवंतपूर - चंदीगड एक्सप्रेस मिरज, सांगलीमार्गे पंजाबसाठी धावत होती, पण कोल्हापुरसाठी तिचा उपयोग नव्हता. शिवाय ती कर्नाटकातून येत असल्याने सांगली, मिरजेसाठीचा कोटाही अत्यंत मर्यादीत होता. कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस या नावाने ती धावायची. कोविडकाळात ती बंद आहे.

नवी प्रस्तावित कोल्हापूर-अमृतसर महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस या भागासाठी हक्काची ठरेल. उत्तर रेल्वेने प्रस्ताव ठेवल्याने ती मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे. सांगली, कोल्हापुरातूनही राजकीय ताकद मिळाल्यास तिला हिरवा कंदील दाखविण्याशिवाय रेल्वे मंडळाला पर्याय नसेल.

टॅग्स :railwayरेल्वेSangliसांगलीkolhapurकोल्हापूर