शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Rain Updates : सांगलीत एनडीआरएफ पथक दाखल, 100 कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 15:02 IST

Maharashtra Rain Updates : आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 41 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळपर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे.

सांगली - जिल्ह्यात व पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धरणांमधून करण्यात येत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आले असून या पैकी एक पथक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. ते आष्टा व शिरगाव या ठिकाणी कार्यरत आहे. आज रात्री दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार आहे. अशी माहिती देऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी बोटींमार्फत रेस्युखल करण्याची वेळ येवू देऊ नये, वेळ आहे तोपर्यंत त्वरीत सुरक्षितस्थळी स्थलांतरण करावे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 100 कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले असून त्यांनी व्यवस्था दोन निवारा केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. जसजसे स्थांलातरीत कुटुंबांची संख्या वाढेल त्या प्रमाणात निवारा केंद्रांची संख्या वाढविण्यात येतील असे डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. सध्या आयर्विंन पूल येथे पाणी पातळी 41 फुटांहून अधिक असून कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे पाणी पातळी संध्याकाळपर्यंत आणखी 10 ते 12 फुट वाढण्याची शक्यता आहे. सांगली आयर्विंन पुलाखाली पाणी पातळी 52 फुटांपर्यंत जाईल हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरणासाठी त्वरित प्रतिसाद द्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे. वेळीच स्थलांतरीत केल्यास पुढील धोके टाळता येतील. असे आवाहन डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

व्यापाऱ्यांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आयर्विन पुलाखाली पाणी पातळी 50 फुटांपर्यंत वाढल्यास बाजारपेठेत, व्यापारीपेठेत पाणी येवू शकते त्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या साहित्याची हलवाहलव करावयाची असल्यास त्यांनाही मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी प्रशासनाची यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस