शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 19:22 IST

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणीही नाराज नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर पक्षातील युवा आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर आपल्या जवळच्या लोकांनाच पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप करत असून त्यामुळे पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चांवर आता स्वत: जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पक्षातील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाहीत. सगळे आपले काम करत आहेत. पक्षात कसलेही मतभेत नाहीत. फक्त माध्यमांनी काही बातम्या केल्या आहेत, असंही पाटील म्हणाले.

"कोणीही नाराज नाही, आता प्रसार माध्यमांत बातम्या तयार केल्या असतील. याबाबत शरद पवार पाहतील आणि निर्णय घेतील. असंही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नाहीत. तिकडे होतं असतील तर माहिती नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नाराजी?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाल्याचे वृत्त समोर आले होते. पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर आपल्या जवळच्या लोकांनाच पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप करत होत असल्याचे यात म्हटले होते.

जयंत पाटील यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक महत्त्वाची पदं आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी, कार्यक्षम आणि निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचं मत नाराज आमदारांनी व्यक्त केल्याचा दावा यात करण्यात आला होता.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस