शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: 'माघार घ्या, आम्हाला पाठिंबा द्या'; विशाल पाटील समर्थकांचे राजू शेट्टी यांना साकडे

By हणमंत पाटील | Updated: April 21, 2024 13:15 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: विशाल पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने दबाव झुगारत शनिवारी स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी व सांगलीचे उमेदवार महेश खराडे यांची  भेट घेऊन चर्चा केली. चर्चेत उमेदवारी मागे घ्या . विशाल यांना पाठिंबा द्या असे साकडे त्यांना घातले

- हणमंत पाटील सांगली - काँग्रेसमधून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार विशाल पाटील यांच्यावर माघारीसाठी महाविकास आघाडीकडून एका बाजूला दबाव सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांच्या समर्थक शिष्टमंडळाने दबाव झुगारत शनिवारी स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टीसांगलीचे उमेदवार महेश खराडे यांची  भेट घेऊन चर्चा केली. चर्चेत उमेदवारी मागे घ्या . विशाल यांना पाठिंबा द्या असे साकडे त्यांना घातले.

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी उद्धवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना मिळाली. त्यामुळे या जागेवर इच्छुक असलेले काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. पाटील यांनी माघार घ्यावी, यासाठी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी व शनिवारी सांगली येथे थांबले होते. त्यांनी विशाल पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. मात्र, विशाल पाटील यांनी त्यांना भेट दिली नाही. उलट विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून अपक्ष निवडणुकीची हालचाल सुरू झाली आहे.

विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मागील आठवड्यात भेट घेतली. त्यावेळी तुमचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर आपण चर्चा करू, अशी सकारात्मकता डॉ. आंबेडकर यांनी दर्शविली होती. त्यानंतर स्वाभिमानी पक्षाचे सांगलीचे उमेदवार महेश खराडे यांची विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी दुपारी भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी शिराळ्यात जाऊन राजू शेट्टी यांच्याशी भेटून सांगलीतील पाठिंब्याविषयी चर्चा केली. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विशाल चौगुले, समाधान आवटी, सचिन वाडकर, सचिन डांगे, संदीप आडमुठे व राजू जाधव यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

विशाल पाटील यांचे शिष्टमंडळ आज भेटून गेले. त्यांनी पाठिंब्यासाठी विनवणी केली. परंतु, आमचे नेते राजू शेट्टी जो आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार असल्याचे सांगितले.- महेश खराडे, उमेदवार, स्वाभिमानी पक्ष

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sangliसांगलीvishal patilविशाल पाटीलRaju Shettyराजू शेट्टीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४