राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. धक्कादायक निकाल समोर आले आहेत, राज्यभरात जल्लोष सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा येथील निवडणुकीत महायुतीने जोरदार फाईट देत जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले होते. पण, पाटील यांनी महायुतीला जोरदार झटका दिला आहे.
या निवडणुकीत जयंत पाटील यांनी नगराध्यक्ष पदासह २३ जागा जिंकत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरात केवळ ८ जागा मिळाल्या. आष्टा नगर परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सत्ता मिळवली आहे. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसने विजय मिळवला आहे.
जत नगर परिषद
जत नगरपरिषदेमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी तयारी केली होती. जतची जागा भाजपाने खेचून आणली.
आटपाडी
आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी आटपाडी नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या साथीत आटपाडी नगरपंचायतीवर यु. टी. जाधव यांनी विजय मिळवला.
पलूसमध्ये विश्वजित कदमांचा विजय
पलूसमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने नगररिषदेतील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजपला याठिकाणी केवळ एका जागेवर विजय मिळविता आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागांवर विजय मिळविला.
विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने नगराध्यक्षपदासह १६ जागा जिंकत सत्ता अबाधित ठेवली. त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजिवनी पुदाले विजयी झाल्या.
तासगाव नगरपरिषदेमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांचा विजय
सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेत माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजया बाबासो पाटील विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी अजितदादा गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील पक्षनिहाय नगराष्यक्ष
एकूण जागा-८ यामध्ये ६ नगरपरिषदा तर २ नगरपंचायत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- ईश्वरपूर नगरपरिषद, आष्टा नगरपरिषद (आष्टा शहर विकास आघाडी)
माजी खासदार संजय काका पाटील यांची स्वाभिमान विकासा आघाडी: १ तासगाव नगरपरिषद
शिवसेना (शिंदे गट) : २ विटा नगरपरिषद, शिराळा नगरपंचायत
भाजप : २ आटपाडी नगरपंचायत, जत नगरपरिषद.
काँग्रेस : १ पलूस नगरपरिषद
Web Summary : In Sangli, Jayant Patil's NCP won, defeating Mahayuti in Islampur and Ashta. Congress won Palus. BJP secured Jat and Aatpadi. Sanjay Kaka Patil won Tasgaon.
Web Summary : सांगली में, जयंत पाटिल की राकांपा ने महायुति को हराया। पलुस में कांग्रेस जीती। भाजपा ने जत और आटपाडी में जीत हासिल की। संजय काका पाटिल तासगांव से जीते।