शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:59 IST

बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध

सांगली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील ८८५ मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला.जत तालुक्यातील ६५ गावांनी २०१२ मध्ये पाणीप्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तोच दाखला देत बोम्मई यांनी ही गावे कर्नाटकात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मंगळवारी केले. त्यावरून महाराष्ट्रात व विशेषत: सांगली जिल्ह्यात वाद पेटला आहे. बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध केला गेला. सीमा लढ्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी येथील ८८५ मराठी भाषिक गावांचा जुना दावा नव्याने मांडला.

बोम्मई यांनी जत तालुक्यावरून राजकीय भांडवल करू नये. लोकांनी काही वर्षांपूर्वी पाणीप्रश्नावरून कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. त्याचा संदर्भ देऊन दावा करणे अयोग्य आहे. तालुक्यातील पाणीप्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. उर्वरित कामेही येत्या काही वर्षांत होतील. त्यामुळे कर्नाटकात कोणीही जाण्यास आता इच्छुक नाही.- विक्रम सावंत, आमदार, जत

जत तालुक्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा करणे अयोग्य आहे. आमचा त्यास विरोध राहील. - विलासराव जगताप, माजी आमदार

भूप्रदेश सलगता व बहुभाषिक या मुद्यावर आमच्यातील काही गावे कर्नाटकला व कर्नाटकातील ८८५ मराठी गावे महाराष्ट्राला मिळावी, अशी यापूर्वीच मागणी केली होती. १९५० मधील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत. अगोदर आमची गावे आम्हाला द्या. - ॲड. अजित सूर्यवंशी, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

जे सरकार भाकरीचा प्रश्न सोडवू शकत नाही, ते असे मुद्दे उकरून काढते. कर्नाटक, महाराष्ट्र व केंद्रातही भाजपचे सरकार असल्याने ते असे प्रश्न पेटविण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्याला भीक घालणार नाही. - ॲड. के. डी. शिंदे, सीमा लढ्यातील कार्यकर्ते

आम्ही जत तालुका तर देणार नाहीच, ऊलट बेळगाव, कारवारसह अन्यठिकाणची मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. - प्रा. शरद पाटील, माजी आमदार व सीमा लढ्यातील कार्यकर्तेजत तालुक्यातील कोणतीही गावे कर्नाटकमध्ये जाणार नाही. जर गावे जाणार नसतील, तर काय उचलून नेणार आहात का? जो पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी मिटलेला आहे. साठ टक्के भागात पाणी पोहोचलेले आहे. उर्वरित ४० टक्के भागात लवकरच पाणी पोहोचेल. आपण दहा वर्ष जत तालुक्याचे आमदार म्हणून काम केले आहे. आजही या गावातले कोणीही कर्नाटकमध्ये जाण्यास तयार नाही. - सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली.

यांनी केला विरोधजत तालुक्यातील पाणी संघर्ष समिती कार्यकर्ते सुभाष कोकळे, जिल्हा परिषद सदस्य तम्मनगौडा रवी यांनीही कर्नाटकच्या दाव्यास विरोध दर्शविला असून, आता तालुक्यातील कोणीही कर्नाटकात जाण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले आहे

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र