शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

महाराष्ट्र जीएसटीचा राष्ट्रीय कर सन्मान पुरस्काराने गौरव, कोल्हापूर विभागाला मिळाला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 14:30 IST

विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान

सांगली : देशभर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘टीआयओएल’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या वस्तू व सेवा कर विभागाला गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ विभागाला ‘मूल्यवर्धित कर प्रशासन’ श्रेणीत सुवर्ण तर ‘सुधारणावादी राज्य’ श्रेणीत रौप्य पुरस्कार मिळाला. दिल्लीतील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. विमा कंपन्यांची १५ हजार कोटींची करचुकवेगिरी उघडकीस आणणाऱ्या कोल्हापूर विभागाला पुरस्कार स्वीकारण्याचा मान देण्यात आला.‘टॅक्स इंडिया ऑनलाइन डॉटकॉम’ तथा ‘टीआयओएल’ हा राष्ट्रीय कर पुरस्कार अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जातो. यावर्षी २४ राज्ये स्पर्धेत सहभागी झाली होती. महाराष्ट्राच्या ‘वस्तू व सेवा कर’ विभागाने राबविलेले व्यापार सुविधा कार्यक्रम, परताव्याची सुलभता, अभय योजना, करदात्यांच्या समस्यांचे समाधान, ‘जीएसटी’ कौन्सिलमध्ये केलेले प्रभावी प्रतिनिधित्व, विवाद कमी करण्यासाठीचे प्रयत्न या सर्व गोष्टींच्या मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.हा पुरस्कार स्वीकारण्याचा मान कोल्हापूर विभागाच्या राज्य कर सहआयुक्त सुनीता थोरात यांना मिळाला. कोल्हापूर विभागाची निवड होणे ही बाब गौरवास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGSTजीएसटी