शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वसगडेत महाराष्ट्र एक्स्प्रेस सहा तास रोखली, प्रवाशांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:16 IST

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे-मिरज मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत

मिरज : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाण्यासाठी सेवा रस्ते करण्याच्या मागणीसाठी वसगडे (ता. पलूस) येथे शेतकऱ्यांनी रेल्वेमार्गावर ठिय्या मांडून तब्बल सहा तास गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. आंदोलनामुळे मिरज-पुणे रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत होती.वसगडे येथे संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यासाठी गेले वर्षभर शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, रेल्वे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून वसगडे रेल्वे गेटवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाल्याने वसगडे येथील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी रेल्वे गेटवर ठिय्या मांडला. दुपारी १२ वाजता मिरजेकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस शेतकऱ्यांनी रोखल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांना हटविण्यासाठी रेल्वे पोलिस सुरक्षा दल व स्थानिक पोलिस आले.

मात्र, शेतकऱ्यांनी हटण्यास नकार दिल्याने रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांचा नाइलाज झाला. तब्बल सहा तास रेल्वेमार्ग रोखल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हाल झाले. एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांनी इतर वाहनाने सांगली गाठली. रेल्वे गेट बंद असल्याने वसगडे ते पाचवा मैल रस्ताही बंद झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.

मिरजेतून आलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांनी मागण्यांबाबत कार्यवाही झाल्याशिवाय रेल्वे सोडणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने सायंकाळी पाचपर्यंत महाराष्ट्र एक्स्प्रेस जागेवरच थांबून होती. याबाबत दि. १६ रोजी पुण्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापक, खासदार, आमदारांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेस मिरजेला रवाना झाली.रेल्वे वाहतूक विस्कळीतआंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखल्याने मिरजेतून पुण्याकडे जाणारी जोधपूर एक्स्प्रेस नांद्रे स्थानकात चार तास थांबून होती. मिरजेकडे येणारी संपर्क क्रांती एक्स्प्रेस किर्लोस्करवाडीला दोन तास थांबविण्यात आली. कोल्हापुरातून गोंदियाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस सांगली स्थानकात दोन तास थांबून होती. या सर्व रेल्वेगाड्या सायंकाळी रवाना झाल्या. कोल्हापुरात येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसला तब्बल सात तास विलंब झाल्याने या रेल्वेतील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे