शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी

By संतोष भिसे | Updated: June 28, 2024 17:23 IST

भुईकोट किल्लाची डागडुजी, मंदिरांचा जीर्णोद्धार करणार

विकास शहाशिराळा : शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मृतिस्थळ उभारण्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १३.४६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पात केली आहे.आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्मृतिस्थळासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी १४ मार्च रोजी निधी मंजूर केला होता. आजच्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष तरतूद जाहीर करण्यात आली.इतिहासात मोगल सैन्य छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद करून बहाद्दूर गडाकडे घेऊन जात असताना शिराळा येथे त्यांच्या सुटकेचा प्रयत्न झाला होता. भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्यासाठी संघर्ष झाला. सरदार जोत्याजी केसरकर, सरदार आप्पासाहेब शास्त्री- दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार व त्यांच्या सोबत असलेल्या ४०० मावळ्यांनी मोगलांशी संघर्ष केला. पण ते अयशस्वी ठरले. या संघर्षाची नोंद इतिहासात आहे. शिराळ्याच्या इतिहासासाठी हे सुवर्ण पान मानले जाते.हा अभिमानास्पद समरप्रसंग पुढचील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी स्मृतीस्थळाची मागणी होत होती. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. त्यासाठी १३.४६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.आमदार नाईक म्हणाले, संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळामध्ये अनेक ऐतिहासिक घडामोडींचा समावेश असेल. भिंतीवरील शिल्पे, छत्रपती संभाजी महाराज अश्वारूढ पुतळा, किल्ल्याची तटबंदी, कोटेश्वर मंदिर, तुळजाभवानी मंदिर यांची दुरुस्ती व जीर्णोद्धार करणे, धारातीर्थी पडलेल्या वीरांची समाधी यांची उभारणी होईल. सर्व बांधकामांना ऐतिहासिक झालर असेल. पर्यटनासाठीही ही पर्वणी ठरणार आहे. उर्वरित निधी मागणीनुसार उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाAjit Pawarअजित पवार