शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh : सांगली जिल्ह्यात रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शनांतून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:07 IST

एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्यात रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शनांतून संतापमराठा आरक्षणाची गर्जना :

सांगली : एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा अनेक घोषणांनी गुरुवारी क्रांतिदिनी सांगली जिल्ह्याचा कानाकोपरा दणाणला. रास्ता रोको, ठिय्या, रॅली, निदर्शने अशा विविध प्रकारच्या आंदोलनांतून आरक्षणाचे वादळ दिवसभर घोंगावत राहिल्याने जिल्हाभर कडकडीत बंद पाळण्यात आला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यात गुरुवारी क्रांतिदिनी आरक्षण क्रांतीचा गजर करण्यात आला. सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिवसभर आंदोलनाची आग धुमसत राहिली. तरीही कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी आठपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली.

 

प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात एकाचवेळी आंदोलनाचे वारे वाहू लागले. या वाऱ्याचे नंतर वादळात रूपांतर झाले. बुधगाव, कवलापूर येथील आंदोलनकर्त्यांनी सांगली-तासगाव रस्त्यांवर टायर पेटविल्या. आंदोलनकर्त्यांकडून महामार्गांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडले होते. रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. हातगाडी विक्रेते, रिक्षावाहतूक, बससेवा, खासगी वाहतूक, शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद राहिली. सर्वच क्षेत्रांवर बंदचा प्रभाव राहिला.सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात सकाळपासून आंदोलनकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भगव्या लाटेत हा परिसर रंगून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी दिवसभर येथे ठिय्या आंदोलन केले. राजकीय नेत्यांना त्यांनी गर्दीत बसवून आंदोलनाचा झेंडा महिला व युवतींच्या हाती दिला. महिला व युवतींच्याहस्तेच मागण्यांचे निवेदन दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.ठळक आंदोलने...

  1. सांगली शहरात दिवसभर ठिय्या आंदोलन
  2. वांगी येथे रस्त्यावर ठिय्या
  3. जत शहरात सकाळी मोर्चा
  4. विटा येथे धरणे
  5. कवठेमहांकाळमध्ये कडकडीत बंद
  6. शेडगेवाडीत तरुणांची रॅली
  7. करगणी-भिवघाट येथे रास्ता रोको
  8. सावंतपूर (ता. पलूस) येथे चक्का जाम
  9. बांबवडे (ता. पलूस) येथे तासगाव-कऱ्हाड रस्त्यावर ठिय्या

टायरी पेटविल्याजिल्ह्यात ठिकठिकाणी टायर पेटवून रस्ते बंद करण्यात आले. मिरज तालुक्यातील बुधगाव, करोली टी, माधवनगर, अंकली, तसेच करगणी याठिकाणी टायर पेटवून संताप व्यक्त करण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदSangliसांगलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा