शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: न्यूयॉर्कमध्ये ‘टाईम्स स्क्वेअर’ वर रोहित झळकले, विजयानंतर चाहत्यांनी दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:46 IST

सांगली : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि दररोज साडेतीन ते चार लाख लोकांची वर्दळ असलेल्या ‘टाईम्स स्क्वेअर’ च्या ...

सांगली : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मध्यवर्ती ठिकाण आणि दररोज साडेतीन ते चार लाख लोकांची वर्दळ असलेल्या ‘टाईम्स स्क्वेअर’ च्या चौकातील इमारतीवर नूतन आमदार रोहित पाटील यांची छबी विजयानंतर झळकली. रोहित यांच्या चाहत्यांनी महिनाभर आधी ‘पेले सॉकर’ या जगप्रसिद्ध दुकानाशेजारील इमारतीवरील जागा बुकिंग केली होती. ‘टाईम्स स्क्वेअर’ वर रोहितदादा झळकल्याची ‘पोस्ट’ समाजमाध्यमात व्हायरल झाली आहे.तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील विरुद्ध आर. आर. आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना येथे रंगला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे प्रचार सभा घेऊन चुरस वाढवली होती. अखेर रोहित पाटील यांनी बाजी मारली. पहिल्याच निवडणुकीत ते आमदार झाले.रोहित पाटील यांच्या विजयानंतर मतदारसंघात सर्वत्र विजयाचे फलक झळकले. समाजमाध्यमांवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्याचवेळी हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या अमेरिकेतील सर्वांत मोठा चौक असलेल्या टाईम्स स्क्वेअर बिलबोर्डवर रोहित पाटील यांच्या अभिनंदनाचा फोटो झळकला. रोहित यांच्या चाहत्यांनी त्यांचा विजयोत्सव अमेरिकेत साजरा करण्यासाठी महिनाभर अगोदर प्रयत्न केला होता. अभिनंदनाच्या जाहिरातीसाठी जागा निश्चित केली होती.रोहित यांचा फोटो न्यूयॉकमधील टाईम स्क्वेअर चौकात झळकल्यानंतर त्याची छायाचित्रे सध्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. ‘रोहितदादा अमेरिकेतही झळकले’ असे चाहते सांगत आहेत. रोहित यांचे चुलते निवृत्त पोलिस अधिकारी राजाराम आर. पाटील यांनी याला दुजोरा दिला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AmericaअमेरिकाRohit Patilरोहित पाटिलtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024